• Wed. Jun 7th, 2023

प्रयोगशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा

प्रयोगशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा

अमरावती : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फेप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षणात प्रयोगशील उपक्रम राबविणा-या शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलींद कुबडे यांनी केले आहे.

मुलांच्या प्रगतीसाठी अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन व त्यांचे उपक्रम इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळावी या हेतूने ही स्पर्धा पाच गटात घेण्यात येत असल्याचे प्राचार्य श्री. कुबडे यांनी सांगितले.

पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहायक व विषय साधन व्यक्ती, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट) या गटातील अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या नवोपक्रमाबाबतचा अहवाल 10 नोव्हेंबरपर्यंतinnovation.secrtmaha.ac.inया लिंकवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी अधिव्याख्याता संजीवकुमार खाडे 9423418027 व डॉ. विजय शिंदे 8805358715 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुबडे यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *