पंतप्रधानांनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “दिएगो मॅराडोना हा फुटबॉलमधील गुरु होता. त्याने जागतिक लोकप्रियता अनुभवली. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने आपल्याला फुटबॉल क्षेत्रातले काही अविस्मरणीय क्षण अनुभवण्यास दिले. त्याचं अकाली निधन हे आपणा सर्वांसाठी दु:खदायक आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो ”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!