निवडणूक निरीक्षक आनंद लिमये अमरावतीत दाखल

अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये हे अमरावती येथे दाखल झाले आहेत.
श्री. लिमये हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महासंचालक पदावर कार्यरत आहेत. अमरावती येथे त्यांचे वास्तव्य व कार्यालय शासकीय विश्रामगृहात पूर्णा कक्ष येथे आहे. संपर्क दूरध्वनी क्रमांक (0721) 2661616 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून समाजकल्याण विभागाचे उपायुक्त सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 7796110107 असा आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!