नागपुरी संत्राला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची धडपड !

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नागपुरी संत्राला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची धडपड !

वरुड :विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या संत्राला चांगला दर मिळावा याकरिता संत्रावर आधारित प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. ही गरज ओळखत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी नागपुरी संत्रावर प्रक्रिया होणाऱ्या प्रकल्पाकरिता पुढाकार घेतला आहे.

कोरोना महामारी च्या काळामध्ये एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतूक फार कमी झाल्यामुळे मालवाहतूक करिता बसेस चा उपयोग केलेला आहे त्या अनुषंगाने अमरावती विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक गबने साहेब व वरुड आगार व्यवस्थापक वानखेडे, यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी चर्चा करून एसटी बस द्वारे संत्रा मालवाहतूक करावी अशी विनंती केली होती त्या अनुषंगाने हा अभिनव उपक्रम श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आला. श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीमार्फत दिनांक ३१ नोव्हेंबर ला १० मेट्रीक टन संत्रा एसटी मालवाहक बसद्वारे नांदेड येथे पाठविण्यात आला वरुड मोर्शी तालुक्यातील पाठवलेल्या संत्रा मालाची प्रत्यक्ष पाहणी व प्रोसेसिंग इंडस्ट्री नांदेड येथील नागपुरी संत्रावर प्रक्रिया होणाऱ्या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन नागपुरी संत्रावर प्रक्रिया करण्या विषयीची माहिती आमदार देवेंद्र भुयार व श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे सर्व कार्यकारी मंडळ यांनी नांदेड येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली त्यावेळी श्रमजीवी संत्रा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष निलेश मगर्दे, श्रमजीवी संत्रा उत्पादक संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रमेश जिचकार, बाळासाहेब कोहळे पाटील, गुड्डू पठाण यांच्यासह आदी मंडळींनी भेट देऊन संत्रा प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली .
नांदेड येथील संत्रा प्रकल्पाला ४५ एम एम ४५ ते ५० लहान आकाराचा असलेल्या टूली संत्रा चा पुरवठा अमरावती जिल्ह्यातून वरुड मोर्शी तालुक्यातून जास्त प्रमाणात होत आहे .
विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. प्रक्रिया उद्योगाचा अभाव त्यासोबतच निर्यातक्षम वाणाच्या अनुषंगाने संशोधन न होणे या कारणामुळे चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपणारा नागपूरी संत्रा पंजाबमधील किन्नोशी स्पर्धेत पिछाडीवर आहे. दराच्या बाबतीतही मोठे चढउतार उत्पादकांनी गेल्या काही वर्षात अनुभवले. ही बाब लक्षात घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी नागपुरी संत्र्यावर आधारीत प्रक्रिया उद्योगाची गरज व्यक्त केली अमरावती जिल्ह्यात मोर्शी वरुड तालुक्यामध्ये विक्रमी संत्रा उत्पादन घेतल्या जाते त्याकरिता लहान टूली आकाराच्या संत्र्यावरील प्रक्रिया उद्योग प्रकल्प विदर्भात एक लाख हेक्‍टरवर संत्रा आतांना सुध्दा या भागात सद्यःस्थितीत एकही प्रक्रिया उद्योग नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयात यांनी व्यक्त केली.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी लक्षात घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्र्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वरुड मोर्शी तालुक्यामध्ये नागपुरी संत्रावर प्रक्रिया होणारा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारन्याकरिता पुढाकार घेतला आहे.