• Wed. Jun 7th, 2023

दुभाजकामधील वृक्षलागवडीने अमरावतीत साकारणार हरित सृष्टी

आ. सुलभाताई खोडके यांनी प्रत्यक्ष पाहणीतून घेतला आढावा ..
शहरात रस्ता निर्मिती व
सौंदर्यीकरणाच्या कामांनी धरला वेग

अमरावती : अमरावती शहराला
नवी चकाकी येण्याकरिता आ. सुलभाताई खोडके
यांनी विकासकामांसह शहर सौदर्यीकरणाचा
धडाका सुरु केला आहे . विविध विकास कामातून शहर कात टाकत असतांना नागरिकांना
हरितसृष्टीचा आनंद व शुद्ध प्राणवायू मिळावा यासाठी शहरातील दुभाजकांवर विविध
प्रजातीच्या सुशोभित वृक्षांची लागवड करण्याला प्राधान्य देऊन आ. सुलभाताई खोडके
यांनी पर्यावरण संतुलन व समतोल राखणे आणि टिकविण्यासाठी जोमाने प्रयत्न चालविले
आहे .

अमरावती ते चांदुर रेल्वे राज्य
मार्गावरील रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालय पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे
,पंचवटी ते नवाथे प्लॉट बडनेरा मार्ग , कठोरा नाका
ते कठोरा या रस्त्यांचे बांधकाम
आदी कामांची आ. सुलभाताई खोडके यांनी
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पाहणी केली .अमरावती
गार्डन क्लब च्या वतीने सुचविण्यात आल्या नुसार वृक्ष लागवड कुठे व कशी
करावी
, दोन वृक्षांमध्ये अंतर
किती ठेवावे
? जमिनीची धूप
थांबविण्यास कोणत्या प्रजाती लावाव्यात
, रोप लागवड करतांना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी , रोप लागवडी
नंतर कोणत्या गोष्टींची खबरदारी
घ्यावी
? झाडांची
रचना करण्यासह वृक्ष लागवडीला घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजना
याबाबतचा संपूर्ण आढावा आ. सौ सुलभाताई
खोडके द्वारे प्रत्यक्ष पाहणीतून घेण्यात
आला . काही ठिकाणी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्याने आमदार महोदयांनी
यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली .
त्याचबरोबर पंचवटी चौक ते इर्विन चौक या रस्त्याच्या लांबीमध्ये
झालेल्या विकास कामाबद्द्दल सौ. सुलभाताईद्वारे समाधान व्यक्त करण्यात आले
.यासोबतच आगामी दिवाळी पर्यंत शहरी क्षेत्रातील पूर्ण रस्त्यांवरील सुशोभीकरणासाठी गार्डन क्लब द्वारे सुचविण्यात आलेल्या
उपाययोजनांच्या अंमलबजावणीची त्वरित पूर्तता
करण्याच्या सूचना आमदार महोदयांच्या वतीने
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या . तदनंतर झालेल्या
कामाचे अवलोकन करण्यासह याबाबतच्या कामांचा आढावा दिवाळी नंतर घेण्यात येईल असे
देखील यावेळी सांगण्यात आले . मालटेकडी परिसर समीप तसेच पंचवटी ते इर्विन चौक या
रस्त्यावरील दुभाजकांमध्ये अनाहूतपणे जी
मोठी झाडे सद्यस्थितीत उगवली आहेत
, त्याबाबत मनपा प्रशासनाच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन ही झाडे त्वरित काढण्याबाबतच्या सुद्धा यावेळी
आमदार महोदयांनी संबंधितांना सूचना प्रदान केल्यात . गार्डन क्लब तर्फे झाडांच्या
मांडणीच्या आराखड्याला घेऊन अंमलबजावणी करण्याचे या दरम्यान सौ सुलभाताईंनी
संबंधितांना निर्देशित केले . शहरातील रस्ते बांधकाम व रस्ते सुधारणा कामकाजाची
पूर्तता होण्यासह शहराचे सौंदर्यीकरण व पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याकरिता ही
वृक्ष लागवड उपयुक्त ठरणार आहे . तसेच
स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने वृक्ष लागवडीचे रस्तेनिहाय नियोजन करण्याकरिता सुद्धा
त्यांनी यावेळी महत्व पूर्ण सूचना केल्यात . या दरम्यान शहरी क्षेत्रातील
सद्यस्थितीतील वृक्ष तसेच सुशोभित झाडांच्या बाबत यावेळी त्यांनी बारकाईने माहिती
जाणून घेतली . शहरातील रस्ते दुभाजकावर
हिरवळ सजविण्याबरोबरच त्याचे
संवर्धन व निगा राखणेही जरुरीचे आहे . त्यामुळे हिरवळ सुकू नये म्हणून वृक्ष
लागवडीला टँकरने नियमित पाणी घालणे
,
जाळीच्या बाहेर वाढलेल्या झाडांची छटाई करणे ,काटेरी झुडपे वाढणार नाही याची काळजी घेणे ,
मोकाट जनावरांपासून वृक्षवेलींचे रक्षण करणे
याबाबतही वृक्षप्राधिकरणाने नियोजन व व्यवस्थापन करणे जरुरीचे असल्याचे आ.
सुलभाताई खोडके यांनी यावेळी सांगीतले . यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभाग
, गार्डन क्लब व
मनपा उद्यान विभागाने समन्वय राखून हरित शहराचा उद्देश सार्थ ठरविण्याचे आवाहन आ.
सुलभाताई खोडके यांनी केले . दरम्यान अमरावती गार्डन क्लब चे अध्यक्ष डॉ दिनेश
खेडकर यांनी सांगितले की
, अनेक तज्ञांच्या
मार्गदर्शनात देण्यात आलेल्या सूचनांनुसार काम झाल्यास नक्कीच या कामातून सुंदर
अमरावती साकारणार आहे. नियोजनपूर्वक विविध झाडांच्या प्रजाती नुसार आणि त्यांच्या
गरजेनुसार माती मिश्रण तसेच पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असून याबाबत
आवश्यक त्या सूचना गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉ दिनेश खेडकर यांनी संबंधित
कंत्राटदाराला दिल्यात . या पाहणी दौऱ्या प्रसंगी आ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता सुनील थोटांगे
, सहायक अभियंता
नितीन देशमुख
,शाखा अभियंता
अनिल भटकर
, सहायक अभियंता राजेंद्र भाकरे , सहायक अभियंता विनोद बोरसे , कंत्राटदार प्रतिनिधी धाने पाटील , सुपर व्हिजन इंजिनियर आवळे , कंत्राटदारांचे अभियंता पाटील ,अमरावती महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत , अमरावती गार्डन
क्लब चे अध्यक्ष डॉ दिनेश खेडकर
, व्ही. आर .देशमुख
,डॉ . शशांक देशमुख ,
सुभाष भावे , मयूर गावंडे , डॉ . गजेंद्रसिह पचलोरे , अविनाश मार्डीकर , ऍड . किशोर शेळके , यश खोडके, गुड्डू धर्माळे , निलेश शर्मा , आदी उपस्थित होते .

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *