• Sun. Sep 17th, 2023

आदिवासी बांधवांच्या चेह-यावर हसू उमटले

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अमरावती : दरवर्षीप्रमाणे
यंदाही दिवाळीनिमित्त आधार फाउंडेशनच्या
सभासदांनी मेळघाटातील अतिदुर्गम भागातील पाड्यांवर भेटी देऊन आदिवासी
बांधवांना कपडे
, ब्लँकेट, चादरी
मुलांना खेळणी तसेच दैनदिन गृहउपयोगी वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीतून आधार फाउंडेशनच्या वतीने
आंदोत्सव हा उपक्रम राबविण्यात आला.

आधार फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त गरीब, निराधार
व आदिवासी बांधवांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. आधार फाउंडेशन तर्फे
मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेल्या एकझिरा
, काकादरी,
रुईफाटा, पिपादरी, मनभंग
यासह विविध आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील बालगोपाल व आदिवासी बांधवांना कपडे
,
ब्लँकेट, चादरी, मुलांना
खेळणी तसेच दैनदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रदीप बाजड यांच्या या
छोट्याशा प्रयत्नाने आदिवासियांची ख-या अर्थाने दिवाळी साजरी होत असल्याने
त्यांच्या चेह-यावर हसू उमटले.

प्रदीप
बाजड यांच्या नेतृत्वात नव्या विचाराने प्रेरित व्होऊन उभी असलेली
निराधारांची
सावली व अनाथांची माऊली असणारा हा
आधार परीवार गेले
५ वर्षापासून अविरत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सज्ज आहे. आधार फाउंडेशनने
आजपर्यंत विविध सामाजिक कार्य अतिशय उत्तमरित्या पार पाडले
, कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या
उद्देशाने या आधारने सतत ५ वर्षे असे अनेक उपक्रम राबविले. उपरोक्त आधारकडून कला
,
क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या
अस्तित्वाचे रोपटे रुजविणा-या लहान-थोरांना आजपर्यंत सन्मानित केले. यंदाचा दिवाळी
सन सुद्धा मेळघाटातील अतिदुर्गम भागातील पाड्यांवर भेटी देत थोड्या वेगळ्या
पद्धतीने पण सामाजिक जाण ठेवत आंदोत्सव वाटून साजरा केला. यावेळी आधार फाउंडेशनचे
अध्यक्ष प्रदीप बाजड तसेच अरविंद विंचूरकर
, दीपक भेलकर,
अतुल राऊत, अशोक इंगळे, अनिकेत
खडेकर
, अमर शाह, राजेश ढिगवार
यांच्यासह आदी
उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,