• Fri. Jun 9th, 2023

परिचय

  गौरव प्रकाशनचं हे तेरावं वर्षं खरं. ऑनलाईन न्यूजपेपर कवितांच्या ग्रुप मधून नंतर त्यातल्या काही काही कवी आणि लेखक यांनी एकत्र येऊन ई पुस्तकं आणि ई नियतकालिकं प्रकाशन व वितरण करण्यासाठी गौरव प्रकाशन 2007 साली स्थापन केलं. आधी मुख्यत्वे कवितासंग्रह, कथा, आत्मचरित्र, कादंबरीपासून प्रवासवर्णनांपासून ते बालसाहितपर्यंत सर्व प्रकारचं साहित्य. इतक्या वर्षांत कित्येक पुस्तकांचं प्रकाशन आणि वाचकांचं प्रेमावरच हे नेटवर्क उभं करण्यात यश आलं आहे. महाराष्ट्रातल्या ‘दुर्गम’ खेड्यापाड्यातले आणि भारतातल्या अन्य राज्यांतलेही आहेत. स्मार्ट फोन्सच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलवर वाचता येतील अशा ई पुस्तकांची डिमांड वाढतच आहे. आणि ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न गौरव प्रकाशन करीत आहे. नवनवीन पुस्तके प्रकाशित करून. WhatsApp, email द्वारे सुद्धा यातील काही पुस्तके उपलब्ध करून देता येईल. अन्यायाला वाचा फोडणार्या, भ्रष्टाचाराच्याविरोधात कठोर भूमिका घेणार्या बातम्या आता गायब झाल्या आहेत..! बातम्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय..! त्यामुळे वास्तव दाखवनार्या‍ पत्रकारांची आता कोंडी झाली आहे..!

  मुंबई, दिल्ली इथल्या एसी ऑफिस मध्ये बसलेले आणि मुंबई, पुणे, नाशिक या शहरापलीकडे महाराष्ट्राची ओळख नसणारे पत्रकार आता तळागळातील, ग्रामिण भागातील बातम्याचा दररोज खून करताहेत. त्यामुळे फसवी कर्जबाजारी, शेतकरी आत्महत्या, औषधी फवारणीत बळी जाणारे शेतकरी, विदर्भाचा अनुशेष हे महत्वाचे प्रश्न आता माध्यमात प्राईम टाईमसाठी वांझोटी चर्चा करण्यापुरते उरलेत. मिडियाचा फोकस आता पूर्णपणे शहरी झाला असून ग्रामीण भागासाठी तिथे स्पेस उरलेला नाही. शेतकरी आत्महत्येच दृष्टचक ‘कधी तरी संपणार का ? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. स्थानिक नेत्यांनी आतापर्यंत स्वत:च्या सोयीसाठी स्वतंत्र विदर्भाचा मुददा आणि अस्मिता वापरून घेतली.

  एकदा सत्ता मिळाली कि विदर्भाचा मुददा त्यांच्यापुरता संपतो. हिवाळी अधिवेशन आता फार्स बनलंय. अधिवेशनाने विदर्भातील प्रश्न सुटतील हि आशा आता अंधश्रद्धा म्हणून शिल्लक राहिली आहे.एवढ सर्व फस्ट्रेशन असताना, प्रसारमाध्यमाच्या भाऊगर्दीत एक अजून न्यूज पोर्टल, अजून एक माध्यम का ? असा प्रश्न स्वाभाविकपणे सर्वाना पडला असेल. मात्र जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे मांडणार आणि ज्याच्या चाबी भांडवलदाराच्या हातात नसेल अशा नव्या प्रसारमाध्यमाचे आपण स्वागतच केले पाहिजे.

  प्रसारमाध्यमे आता काही मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये एकवटली आहेत. ज्या संस्था उदयोगपत्यांच्या नियंत्रणाखालीगेल्यात तिथे पत्रकारांचे अधिकार, स्वातंत्र्य, हिरावून घेण्यात आले आहेत. किंवा ती प्रक्रिया हळूहळू सुरु झालीये. संपादकीय विभागावार आता मार्केटिंग विभागाच प्रभुत्व ठळकपणे जाणवत आहे. ज्यावेळी बातम्या संदर्भातील निर्णय भांडवलदार घेतात, पावरफुल वर्गाच्या सोयीच्या, हिताच्या बातम्या देण्यास सुरुवात होते. त्यावेळी आर्थिकदृष्ट्या मागास, मागासवर्गीय, पीडित, आदिवासी, शेतकरी, शोषित, लोंकाना न्याय देण्याची प्रक्रिया थांबते, मिडियात या वर्गाला कुठलच स्थान उरत नाही. सध्या आपल्या माध्यमातूनची परिस्थिती अशीच काहीशी झाली आहे.

  प्रसारमाध्यमाचा फोकस आता सामान्य माणसावरून घसरून सत्ताधारी, उद्योगपती, शोषक आणि आहेरे वर्गावर येवून ठेपला आहे.याच भूमिकेतून आम्ही सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय, शोषित, वंचित, आदिवासी बांधव, महिला आणि तरुणासाठी आम्ही घेवून येतोय तुमच्या हक्काच माध्यम गौरव प्रकाशन हे न्यूज पोर्टल आम्ही सुरु केलंय, या माध्यमातून अनेकांना हक्काचं विचारपीठ निर्माण होणार आहे.आम्ही बातम्याच्या माध्यमातून वाचक, साहित्यीकापर्यंत घेवून जाणार आहोत. महत्वाचं म्हणजे कुणाच्याही दबावाखाली काम न करता निर्भीड पत्रकारिता करण्याच आम्ही वाचकांना वचन देतोय.आम्हास तुम्ही यावर संपर्क करू शकता.

  Email : gauravprakashan1@gmail.com
  बंडूकुमार धवणे
  संपादक
  गौरव प्रकाशन,अमरावती

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “परिचय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *