अमरावती : बेरोजगार युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने दि. 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवकांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवावा. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर डिप्लोमा व इतर पात्रता धारण केलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होण्यास पात्र असतील. या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड लॉग इन होऊन ऑनलाइन नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांनी प्रथमतः नोंदणी करून त्यानंतर प्राप्त होणारा युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून मेळाव्यातील रिक्त पदांकरिता आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करावे.
अधिक माहीतीकरीता कार्यालयाच्या 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ई-मेलवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अमरावती प्रफुल शेळके यांनी केले.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024