अमरावती : २४ जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ७४ रूग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत २१ हजार २0३ रूग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ४१३ रूग्णांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला असून २0 हजार पेक्षा जास्त रूग्णांचा रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ४00 च्या जवळपास रूग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासुन सातत्याने वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येमध्ये कमी जास्त प्रमाणात घट आणि वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.परिणामी अनेकांमध्ये या संदर्भात भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे.बाजारपेठामध्ये अदयापही काळजीवाहु नागरिकांची संख्या कमी प्रमाणात असून बिनधास्तपणे शासकीय नियमांचे उल्लंधन करणार्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे लग्न तसेच इतर कार्यक्रमांना र्मयादित संख्या लक्षात घेवून परवानगी देण्यात आली असली तरी प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांवर सर्रास पाणी फेरण्याचे काम नागरिकांकडून होत आहे. परिणामी कोरोना ग्रस्तांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. २४ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ७४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्हयात आतापर्य २१ हजार २0३ रूग्ण आढळून आले आहेत. ४१३ रूग्णांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला असून २0 हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४00 च्या जवळपास रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
Related Stories
December 2, 2023