अमरावती : ब्रिटन सारख्या देशामध्ये निर्माण झालेल्या कोरोना पेक्षा घातक महामारिचा संभ्रम भारतामध्ये कायम असतांना कोविड १९ विषाणुचा प्रभाव हा पुन्हा देशात मोठया प्रमाणात जाणवु लागला आहे. अमरावती जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५0 पेक्षा कमी होतांना दिसून येत नाही. २८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधरे ६४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली असून जिल्हयात आतापर्यत १९ हजार ४६0 रूग्णा हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.३९६ रूग्णांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला असून १८ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर आंकुश लावण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न केल्या जात आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये दरदिवसाला ५0 पेक्षा जस्त रूग्णांची भर पडत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.दोन दिवसापूर्वीच हाच आकडा चक्क ९५ पर्यत गेला होता. त्यामुळे सतत वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे एकीकडे काही जणांच्या चेहर्यावर भिती दिसून येत आहे तर काही वागण्यात अदयापही जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. अशाच काहीशा बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना रूग्णामध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे शासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन करण्यापेक्षा ते नियम पायदळी तुडविण्यात अनेकांना रस असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठामध्ये असो वा कार्यक्रमामध्ये वावरतांना मास्क तसेच सोशल डिस्टंन्सीग सारख्या नियमांचे सर्रास उल्लंधन होतांना दिसून येत आहे. २८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ६४ नविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. परिणामी जिल्हयात १९ हजार ४६0 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ४३२ रूग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून १८ हजार ६३२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023