पुणे : पुणे जिल्हय़ातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगाव सह अकरा गावामध्ये ३0 डिसेंबर ते २ जानेवारी २0२१ पयर्ंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास १ जानेवारी रोजी दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे. हे लक्षात घेऊन, भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३0 डिसेंबर ते २ जानेवारी २0२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024