यवतमाळ : जिल्ह्यातील साडेचारशे ग्रामपंचायतींची निवडणुक होत आहे. ११ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन राखण्यासाठी जिल्ह्यातील ३३ पोलीस अधिकार्यांची वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सोमवारी सायंकाळी या संबंधीचे आदेश जारी केले.
पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यवतमाळ ग्रामीण, विलास चव्हाण महागांव, प्रकाश तुनकलवार राळेगांव, तर पोलीस निरीक्षक अजित राठोड यांची कळंब पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यवतमाळ शहर वाहतूक नियंत्रण शाखा, गणेश वनारे टोळी विरोधी पथक प्रमुख, गजानन पाटेकर जनसंपर्क अधिकारी एसपी कार्यालय, तर सहायक पोलीस निरीक्षक अनिल घुगुल यांना पासपोर्ट कार्यालयात नेमणुक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षकांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. फौजदार मंगेश डांगे बाभूळगांव, किशोर मावसकर कळंब, दिलीप गवई नेर, अजहर नसीर शेख पुसद ग्रामीण, रामेश्वर कांडुरे जनसंपर्क अधिकारी, भगवान पायघन आर्थिक गुन्हे शाखा, योगेश रंधे टोळी विरोधी पथक, राजेश पुरी दारव्हा, शिवाजी टिपुर्णे वणी, विनीत घाटोळ उमरखेड, प्रदीप घटे वसंतनगर, सागर बारस्कर पुसद शहर, संदीप बारिंगे पांढरकवडा, राजाभाऊ घोगरे घाटंजी, दर्शन दिकोंडवार अवधूतवाडी, गणेश चोपडे यवतमाळ शहर, किशोर वाटकर पोफाळी, दुर्गालाल टेंभरे पारवा ठाण्यांतर्गत सावळी सदोबा पोलीस चौकी, गोपाल उताने यवतमाळ ग्रामीण, गजानन देशपांडे मानव तस्करी विरोधी पथक, विनायक गावंडे कळंब, रामनिहार यादव वाचक शाखा, चंदू चौधरी बिटरगांव, तर पोलीस उपनिरिक्षक राहुल वानखडे यांची महागांव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
Related Stories
December 2, 2023