अमरावती : जिल्हयात कोरोनाने पुन्हा आपले पाय पसरायला सुरूवात केली असून मागिल आठ दिवसापासुन १ हजार ३00 च्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोद करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात २३५ कोरोना रूग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयात एकूण २३ हजार २९३ रूग्णांना कोरोनाची लागन झाल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. मृत्यूचा आकडा देखिल दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यत ४२३ रूग्णांचा कोरोनाम ुळे मृत्यू झाला आहे. २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४00 च्या जवळपास रूग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासुन सातत्याने जाणवत असलेली बोचरी थंडी आणि नागरिकांचा बेजबादारपणा या दोन्ही कारणामुळे जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. काही महिन्यापूर्वी आरोग्य प्रशासनाच्या डोक्यावरील भार कोरोना रूग्णांच्या शुन्य आकडेवारीमुळे कमी झाला होता.मात्र गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोरोनाचा प्ररंभीकाळाची परिस्थीती निर्माण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात नुकताच राज्याचे गृहमंत्री यांचा दौरा आटोपला असता त्यांना कोरोनाची लागन झाल्याची बातमी समोर आली तर राज्याचे माजी कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना देखिल कोरोनाची लागन झाल्यामुळे जिल्हयात सर्वत्र भितीचे वातावरण पहावयास मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखिल प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले नसल्यामुळे आजच्या दिवसाचा परिणाम हा सर्वाना भोगावा लागत आहे. विशेष म्हणजे इतकी चिंता करणारी परिस्थीती निर्माण झाली असतांना देखिल असंख्य नागरिक हे अदयापही मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्ंसींग सारख्या नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही. ८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हयात २३५ रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह निझाले असून २३ हजार २९३ रूग्णांना आतापर्यत कोरोनाची लागन झाली आहे. ४२३ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024