Skip to contentनव्या आगमनांन आलं २०२० वर्ष
परिवर्तनचं नवं अध्याय होणारं वर्ष
मानवतेच्या दृष्टीने मोठं धोकादायक निघालं
माणसाला माणसापासून दूर करणारं निघालं
आपल्याच देशात स्वतःला परक ठरवणार बनलं
जगातील लोकशाहीचे स्तंभ नष्ट करणारं ठरलं
कोरोना विषाणूच्या महामारीत
लॉकडाऊनच्या बंदिस्त फतव्यानं
एन आर सी,सी ए ए जनआंदोलन थांबवणार
जातीय -धार्मिक दंगली घडवणारं
कोविड-१९ रोगातही धर्म जातीचं
आपल्याच माणसाला पाहू न देणारं
आपल्याच मायभूमीत परतू न देणारं
हुकूमशाही मग्रुरवृत्तीला मोठं करणारं
चीनच्या वुहान शहरातून सुटलेल्या सुक्ष्मजीवानं
करोडो माणसाना भूके कंगाल करणारं
हजारो मैलाचा प्रवास करायला लावणारं
लाखो लोकांचा संसार उध्दवस्त करणारं
शिक्षणाच्या साऱ्या वाटा बंद करणारं
तान्हुल्या बाळाचं,गरीब कामगार,वृध्द,गरोदर महिला
या माणसाचं जीणं हैरान करणारं
माणसाला भूतकाळात घेऊन जाणारं
प्रगतीचे सारे मार्ग थांबवणारं
सर्व तंत्रज्ञानाला क्षणात रूकवणारं
रस्ते असून चालता न येणारं
दवाखाने असून डॉक्टर नसणारं
मानवतेच्या जगण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टराचं,नर्सचं,वार्ड बायचं,सफाई कामगाराचं,पोलिसाचं,शिक्षकाचं,मदत करणाऱ्या कार्यकर्त्याचं
वँक्सिनसाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञाचं
अन्न पीकवणाऱ्या शेतकरी मायबापाचं
कामगार हक्कासाठी , कृषी कायद्यासाठी , तरूणाईच्या हक्कासाठी,आंदोलित ठरलेलं वर्ष
नव्या युगाचं नव परिवर्तन करणारं ठरावं
कोरोनाची दहशत कमी करणारं असावं
माणसाला माणसाशी जोडणारं असावं
अंधभक्ताना प्रकाश दाखवणारं असावं
विषमता निर्माण करणाऱ्यांना जमीनदोस्त करणारं असावं
भारतीय संविधानाला नष्ट करणाऱ्या विकृत मेंदूची खांडोळी करणारं असावं
निसर्गाच्या बदलत्या प्रवाहाला सोबत करणारं असावं
लव जिहाद असैवधानिक कायदे करणाऱ्यावर आसूड असावं
नव्या तंत्रज्ञानाची कास धरणारं असावं
नव्या समाजमनाचं नवं वर्ष असावं
ज्ञानहिमालयाचा उत्तुंग विद्यार्थी घडवणारं असावं
भेदाभेदाच्या भिंती उद्धवस्त करून लोकशाहीचं सुंदर नंदनवन फुलवणारं नव वर्ष असावं…
Post Views: 52
Like this:
Like Loading...