- * पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपयर्ंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपयर्ंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांचे दुमत होते. पण अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते बारावीपयर्ंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. विशेषत: त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.पहिली ते सातवीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.
१ डिसेंबरपासून पहिली ते सातवी शाळा सुरु होतील, असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा सुरु होणार आहेत. सर्व शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे हे आवश्यक आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे व सॉनिटायझरचा वापर घेणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भातील सूचना शिक्षकांना देण्यात येणार आहे.पालकांना इच्छा असेल तर पाल्यांना शाळेत पाठवायचे आहे. मुलांना शाळेला पाठवयाची सक्ती असणार नाही, असेही राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट केली आहे. येणार्या काळात कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेवून अंमलबजावणी करावी, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.