- मी तुझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवतो
- तुझा सहवास मला मनातून भावतो
- तुला उपभोगण्याचे मला स्वातंत्र्य दे
- तुझ्या हयातीचा दाखला एकदा बघू दे !
- झालंच तर आणखी एक कर
- वंचितांच्याही पदरात थोडंसं दान दे
- धनदांडग्यांची रखेल न होता
- थोडी गरीबीमुक्त जिंदगीची चव दे !
- -अरुण विघ्ने