हेडफोन अथवा इयरफोनचा वापर ही एक सवयीची आणि काही वेळा गरजेची बाब असते. पण ही खरेदी करताना काही टिप्स लक्षात घ्याव्या. उदाहरणार्थ बाजारात घरातल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही ठिकाणच्या वापरासाठी वेगवेगळी उत्पादने उपलब्ध आहेत. हे लक्षात घेऊन हेडफोन्सचा सर्वात जास्त वापर कुठे होणार आहे हे बघावे. रहदारीतून प्रवास करताना हेडफोन्स वापरणार असाल तर नॉईज कॅन्सलेशन फिचर असल्याची खात्री करून घ्यावी. यामुळे बाहेरचा कोलाहल रोखला जातो आणि तुम्ही हव्या त्या आवाजाचा आनंद घेऊ शकता.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023