सौरव गांगुलीला मध्यंतरी हृदयविकाराचा झटका आला होता. अवघ्या ४८ वर्षांच्या तंदुरुस्त सौरवला हृदयविकाराचा झटका आल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं गेलं. सौरवला सौम्य कार्डिअँक अरेस्ट आल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आता कार्डिअँक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. कार्डिअँक अरेस्ट म्हणजे हृदयक्रिया बंद पडणं आणि हार्ड अटॅक म्हणजे हृदयाचा विशिष्ट भागाच्या कार्यावर परिणाम होणं किंवा त्या भागाचं कार्य थांबणं. छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना होणं, जीव गुदमरणं, छातीवर दबाव येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर बंद झालेली धमनी पुन्हा कार्यरत केली जाते. या प्रक्रियेला अँजिओप्लास्टी असं म्हणतात. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला आयुष्यभर अँस्परिन आणि वर्षभर ठराविक औषधं घ्यावी लागतात.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यामागची कारणं जाणून घेणं आवश्यक असतं. अनुवांशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. यासोबतच सी रिअँक्टव्ह प्रोटनची (सीआरपी) पातळी तपासून घ्यावी लागते. सीआरपीची पातळी एक ते तीन दरम्यान असल्यास हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते.तसंच ही पातळी तीन ते दहाच्या दरम्यान असल्याचं ही शक्यता अनेक पटींनी वाढलेली असते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णावर तातडीने उपचार होणं आवश्यक असतं. अशा रुग्णांवर साधारण एक ते दोन तासांमध्ये अँजिओप्लास्टी व्हायला हवी. अँजिओप्लास्टीनंतर रुग्णाची नीट काळजी घ्यायला हवी. अशा रुग्णांनी संतुलित आणि पोषक आहार घ्यायला हवा. तसंच हालचाल आणि व्यायामाला टप्प्याटप्प्याने सुरूवात करायला हवी. वेळेत औषधं घेणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणंही आवश्यक आहे.
Related Stories
September 3, 2024