- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : वऱ्हाडातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तसेच स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारा चरित्रकोश हा महत्वपूर्ण ग्रंथ विभागीय ग्रंथालयात उपलब्ध आहे. ग्रंथालयाच्या वेळेत तो विद्यार्थी अभ्यासक वाचकांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांनी कळविले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात नुकतेच एका प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले. त्यात भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास समिती व दर्शनीक विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला व प्रा. न. र. फाटक व तज्ज्ञांनी संपादित केलेला स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश हा अभ्यासकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रंथाच्या खंड एक व दोनमध्ये विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे. विद्यार्थी अभ्यासक व जिज्ञासूंनी ग्रंथालयाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. मडावी यांनी केले आहे.