आपण बारीक असल्याने निरोगी आहोत, आपल्याला व्यायामाची गरज नाही, तेलकट पदार्थ खाल्ले तरी काही फरक पडत नाही, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात हा समज अगदी चुकीचा आहे. सडपातळ बांधा हे निरोगी असण्याचं लक्षण असतंच असं नाही. बारीक माणसांमध्येही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. बारीक म्हणजे निरोगी हा समज चुकीचा कसा, याविषयी..
* बारीक माणसांच्या शरीरात चरबीचं प्रमाण जास्त असू शकतं. बाहेरून बारीक दिसत असले तरी त्यांच्या शरीराच्या आतल्या भागात चरबी साठत जाते. विविध अवयवांच्या भोवती तसंच त्वचेच्या खालच्या भागात चरबी साठू लागते. स्थूल लोकांच्या तुलनेत बारीक माणसांच्या शरीरात या चरबीचं प्रमाण जास्त असतं. बारीक असल्याचं कारण देत एखादी पाणीपुरी जास्त खाल्ली तर शरीराच्या आतल्या भागात चरबी साठत जाते. भविष्यात याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
* चुकीच्या जीवनशैलीमुळे बारीक लोकांना मधुमेह जडण्याची शक्यता जास्त असते. बारीक लोकांनी आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही, हा समज चुकीचा आहे.
* जाड किंवा निरोगी लोकांच्या तुलनेत बारीक लोक जास्त आळशी असू शकतात. बैठी जीवनशैली आणि जंक फूडचं अतिसेवन याला कारणीभूत ठरतं. बारीक असल्याने जंक फूडचा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही हा समज चुकीचा आहे.
* बारीक लोकांच्या शरीरात अन्नातले पोषक घटक कमी प्रमाणात शोषले जातात. यामुळे चयापचयाची क्रिया मंदावते. यामुळे हृदयविकार आणि मधुमेहासारखे विकार होण्याची शक्यता वाढते.
* व्यायाम आणि संतुलित आहाराचा अभाव असेल तर बारीक लोकांच्या त्वचेवर परिणाम दिसू लागतात. अशा लोकांची त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते.
* बारीक लोक वरचेवर आजारी पडतात. त्यांची प्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे बारीक म्हणजे निरोगी हा समज काढून टाकून चांगली जीवनशैली अवलंबायला हवी.
Related Stories
September 3, 2024