वरुड : लोढा साहेबांच्या बदली नंतर वरुड तहसील मध्ये अवैध धंद्याला उत आला आहे. अवैध रेती वाहतूक जोरात सुरू असताना महसूल प्रशासनाने गेल्या दोन महिन्यात एकही कारवाई केली नाही. त्यातही कहर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत लाचखोर निवासी नायब तहसीलदार ढबाले यांनी पैसे खाऊन विना दंड करता गाडी सोडली.अवैध रेती वाहतुकी वर स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करत आहे .२१ मार्च रोज रविवारला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या हद्दीतील बेनोडा(शाहिद) पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी करून वरुड कडून मोर्शीला जाणारे ट्रक क्र एमएच ४0 एके/ ३६४७ व एमएच २७ /एक्स/७८४९९ (दोन्ही एलपी) यांच्या वर आलेल्या संशयावरून त्यांना थांबवले असता त्यामध्ये एक पूर्णत: चोरीची तर एक जास्त प्रमाणात भरलेली आढळून आली .सदरील गाडीवर कारवाई करून बेनोडा पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन ,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनीरीक्षक सूरज सुसतकर व यांचे पथकातील दीपक सोनाळेकर ,चेतन दुबे,स्वप्नील तवर ,निलेश डांगोरे व चालक राहुल सोलव यांनी केली आहे.ह्या कारवाया होत असताना वरुड तहसील प्रशासन मात्र झोपेत असल्याचे सोंग घेत असताना मात्र जिल्हा स्तरावरून येऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करत आहे हे मात्र विशेष.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024