मेकअप प्रॉडक्ट्स सौंदर्यवर्धन करत असली तरी त्यांच्या वापराचे काही साइड इफेक्टही असतात. म्हणूनच मेकअपचं सामान विकत घेण्याआधी काही बाबींकडे लक्ष द्यायला हवं. मेकअपचं सामान विकत घेण्याआधी तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या. काही प्रकारचा मेकअप लावल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होतात. अशा मेकअपला ‘कोमेडोजेनक’ असं म्हटलं जातं. त्वचेची छिद्र बंद झाल्याने ब्लॅकहेड्स किंवा व्हाइटहेड्सची समस्या निर्माण होऊ शकते. खनिजयुक्त मेकअप प्रोडक्टस निवडा. खनिजं १00 टक्के नैसर्गिक असतात. खनिजांमुळे अँलर्जी होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे मेकअप केल्यानंतरही त्वचेचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर खनिजयुक्त मेकअप प्रोडक्टसना प्राधान्य द्या. काही मेकअप प्रोडक्ट अल्कोहोल, पेपरमिंट, मेंथॉल, सिट्रस अशा घटकांपासून तयार केली जातात. या घटकांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यामुळे त्वचा कोरडी पडण्याचाही धोका असतो. म्हणूनच मेकअपचं सामान निवडताना त्यातील घटकांची खात्री करून मगच विकत घ्या. ओठ किंवा त्वचेच्या काळजीसाठी घरगुती साहित्य आणि नैसर्गिक घटकांचा वापर करा. यामुळे अँलर्जीचा धोका राहणार नाही. हलक्या दर्जाची कॉस्मेटिक्स लांबच ठेवा.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023