- पिंपळखुटा/स्वाती न.इंगळे
येथील श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद विठ्ठलराव आंबटकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी.आर.मोहोड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त संजयराव देशमुख,सुधाकरराव बांते केंद्रप्रमुख श्री बावणे प्राचार्य डॉ.सुभाष मुरे ज्येष्ठ शिक्षक डी.आर.डेरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री प्रमोद आंबटकर हे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा तसेच त्यांच्या पत्नी सविता आंबटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,मोमेंटो,भेट वस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विविध मान्यवरांनी प्रमोद आंबटकर यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा आढावा विषद केला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद आंबटकर यांनी संस्था व शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करतानाच आपल्या सेवा कार्यात मार्गदर्शन करणारे संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मित्र परिवाराचे सहकार्याबदल आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन ए.आर.डुमरे तर आभार प्रदर्शन रामेश्वर नागपुरे यांनी केले.शासकीय नियमाचे पालन करीत या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.