राष्ट्रवादीच्या प्रदीप राऊत गटाचे वर्चस्व ; छायाताई दंडाळे गटाचा दारुण पराभव
- शेंदूरजना बाजार/डॉ नरेश इंगळे
राज्य पणन महासंघाच्या संचालिका सौ छाया दंडाळे यांना सुरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस प्रदीप राऊत व अतुल गवड यांच्या गटाच्या ग्रामविकास पॅनेलने सातपैकी सातही जागा जिंकुन दंडाळे गटाकडुन ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली.
जिल्हा व राज्यपातळीवर कॅाग्रेस पक्षाचे नेत्रुत्व करणार्या छाया दंडाळे यांच्या ग्रामसुधार पॅनेलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.सौ.दंडाळे यांनी आपल्या कन्येला वार्ड क्र.१ मधुन ऊभे केल्याने ही लढत अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. मात्र त्यांच्या कन्या रुचिका दंडाळे यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले. रुचिका दंडाळे हिला राऊत -गवड गटाच्या सौ.ललिता प्रमोद बोराळकर यांनी एकतर्फी लढाईत पराभूत केले.विजयी उमेदवारामध्ये वार्ड क्र एक मधून छाया संजय ताथोडे ललिता प्रमोद बोराळकर गजानन सुधाकर निकाळजे वार्ड तिनं मधून गणेश हरिदास भोमबे आरती योगेश कोहळे वार्ड क्र तीन मधून रविंद्र वामनराव इंगळे शीतल नरेश नागपुरे यांचा समावेश आहे.