सुपरस्टार रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे तुम्हाला सांगायला नको. आपल्या आवडत्या हिरोची पडद्यावरील एक एंट्री पाहण्यासाठीही येथील चाहते तुफान गर्दी करतात. तर, काही चाहते रजनीकांत यांना चक्क देव मानतात. आपल्या चाहत्यांचा आदरही रजनीकांत तितकाच करतात हे आपल्याला पहायला मिळते. कारण, रजनीकांत यांनी आजपर्यंत कुठल्याही मोठय़ा ब्रँडची जाहिरात न स्वीकारण्याचे कारणही त्यांचे चाहतेच आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार कुठल्यातरी कंपनीचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत. मात्र, रजनीकांत कधीही जाहिरातींमध्ये काम करताना दिसले नाहीत. रजनीकांत यांनी करोडो रुपयांच्या जाहिरातींच्या ऑफर नाकारल्या आहेत. रजनीकांत यांना अनेक जगप्रसिद्ध ब्रँडने विचारणा केली. पण, त्यांनी सर्वांना नकार दिला. भारतात कोला कंपनीने तर करोडोंची ऑफर रजनीकांत याना देऊ केली होती. पण, त्यांनी कोलाच्या प्रतिनिधीला भेटायचे नाकारले होते. अशा जगप्रसिद्ध अभिनेत्याला सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली. चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणार्या ज्येष्ठ कलावंतांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. रजनीकांत हे मागील पाच दशकांपासून सिनेसृष्टीत आहेत.
लोकांचं मनोरंजन करीत आहेत. चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय मागे घेतला होता. सध्या तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने अनेक राजकीय पक्षाच्या नजरा रजनीकांत यांच्या सर्मथनाकडेही लागलेल्या आहेत. रजनीकांत यांच्या मते त्यांचे चाहते त्यांना देवासारखे मानतात, त्यांचे अनुकरण करतात. रजनीकांत पैसे घेऊन एखाद्या वस्तूची जाहिरात करतील तर त्यांचे चाहते त्यांचे अनुकरण करून त्या वस्तू विकत घेतील. हा धोका असल्याचे रजनीकांत यांना वाटते. तसेच देवाने कोक किंवा इतर पदार्थ विकले तर ते कसे वाटेल. रजनीच्या चाहत्यांना हे आवडणारे नाही, असा विचार रजनीकांत करतात. त्यामुळेच रजनी यांनी आपल्या कारकीर्दीत जाहिरातींद्वारे पैसे कमावण्यास नकार दिला आहे.
प्रमोद बायस्कर