नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यानुसार ४ मे ते ११ जून या कालावधीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार असल्याचे ते म्हणाले.
हे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई.एनआयसी. इन आणि सीबीएससी.जीओव्ही.इन या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे.
प्रिय विद्यार्थ्यांनो बहुप्रतीक्षित सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकाची घोषणा करत असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले. ही परीक्षा सुरळीत पार पाडवी यासाठी आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले.
देशभरातील विविध राज्यांमध्ये दहावी व बारावीसाठी सीबीएसई बोर्डाच्यावतीने परीक्षा घेतली जाते. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरीयाल यांना या अगोदरच सांगितले होते की, २ फेब्रुवारी रोजी दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यानुसार आज या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
Related Stories
December 7, 2023