सावित्री क्रांतीज्योती
स्त्रीजातीच्या उद्धारासाठी
तू लेखणी घेतलीस हाती
स्त्री जातीला हीन समजून
लेखले जायचे कमी
पण कंबरडे मोडून मनुचे
तूच घेतलीस स्त्रीशिक्षणाची हमी
झेलून अंगावरती
दगड धोंडे अन प्राण्याची विष्टा
इथल्या धर्मसंस्कृतीने
तुझी खूपच केली चेष्टा
वाघीण तू ज्योतिबाची
भ्यालीच नाही कुणाच्या बापाला
धाक दाखवून लेखणीचा
पळविले तू मनुवादी सापाला
आज तुझ्यामुळेच स्त्रीशिक्षणाची
ज्योत इथे पेटली
म्हणून तर आज स्त्रीयांनी
यशाची शिखरं गाठली
विद्येची तू देवता म्हणून
तुलाच मिळावा पहिला मान
कारण तुझ्यामुळेच जागा झालाय
स्त्रियांचा आत्मसन्मान
ज्योत पेटवून स्त्रीशिक्षणाची
तू ठरलीस समस्त विश्वाची माई
थोर तुझे उपकार स्त्रीशक्तीवर
ती धन्य सावित्रीआई
ती धन्य सावित्रीआई
विद्रोही कवी
रविंद्र सोनाळे गायतोंडकर
(रा प महामंडळ रायगड)
ता. हदगाव जि नांदेड
**********************
मो 9960421715