- कुऱ्हा/नितीन पवार
रासेयो द्वारा स्वयंसेवकांचे व्यक्तिगत हित, समाजहित आणि सर्वांगीण विकास साधला जातो. त्यांच्यात स्वयंशिस्त सोबतच समाजामध्ये वेळोवेळी उदभवणार्या समस्या आणि अडचणीची जाणीव होत असते.स्वतःसाठी नव्हेतर इतरासाठी जगलो पाहिजे ही ऊर्मी युवकांच्या अंगी आणण्याचे महत्कार्य रासेयो द्वारा होत असून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना खऱ्या अर्थाने हक्काचे विचापीठ असल्याचे मत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ नरेश शं.इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस कार्यक्रम प्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ नरेश इंगळे यांनी हे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा सुषमा थोटे प्रा सुषमा कावळे प्रा श्यामला वैद्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरानी युवक आणि रासेयो यावर मत मांडतानाच रासेयोच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन प्रा विजय कामडी तर आभार प्रदर्शन डॉ मेघा सावरकर यांनी केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.