- काम नाही धंदा नाही
- गरीबी मात्र छेडत आहे
- एक वेळ उपाशी इथे
- गरीब बघ ना राहत आहे
- याचा टॅक्स त्याचा टॅक्स
- टॅक्स सर्व घेत आहे
- एक एक रुपयासाठी
- मात्र गरीब इथे लढत आहे
- घर गेले वाहून
- त्या अवकाळी पावसात
- नागरिकांची सुरक्षा म्हणून
- ही सरकार काय करत आहे?
- राहिला तो गरीब
- थंडीनं तडपडत
- अधिकाऱ्यांचे मजले मात्र
- एकावर एक चढत आहे
- ओळखीचे गल्ले
- ओळखीने लावत आहे
- मेहनत करणाना विद्यार्थी मात्र
- नशिबाला कोसत आहे
- बलात्कारी इथे बघ ना
- सुसाट फिरत आहे
- महिलांच्या सुरक्षतेसाठी
- सांग ना ही सरकार काय काय करत आहे?
- हे केलं ते केलं
- आम्ही पैसे खात्यात टाकले
- अस म्हणून मात्र बघ ना
- गॅस चे भाव वाढवत आहे
- बेरोजगारी वाढली
- सोय इथे खाण्याची नाही
- आत्महत्येला कारणीभूत
- सांगा ना कोण इथे आहे
- -प्रतिक्षा गजानन मांडवकर
- ‘स्वप्न डोळ्यातले’
- 8308684865
- यवतमाळ
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–