Skip to content
वंदन माझे गुरू रविदासांना //
नमन करितो तवचरणांना//धृ//
माघ पोेर्णिमेला सूर्य उगवला/
रघुराम पिता रघुराणी माता/
सुसंस्कारांचे मातापिता दाता/
करद्वयांनी प्रणाम रैदासांना//१//
वादविवादात यशश्रीही प्राप्त/
बहुजन व्हावे स्वयंप्रकाशित/
उपदेशांचा या प्रकाश जगात /
रविदास तत्व सांगू जनांना//२//
सर्वा मिळो अन्न सम उच्च निच/
असे हे राज्य असो सुविचारांचं/
मनुष्याचे कर्म उच्च असा धर्म/
उच्च निच भेद अमंगल कर्म /
नमन करु रविदास तत्वांना//३//
कवी:-प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
Email :-arunbundele1@gmail.com
Like this:
Like Loading...