- स्वच्छतेचा महान संदेशानी
- गावागावाची सफाई केली.
- किर्तनाच्या माध्यमातूनी
- मनामनातील घाण साफ केली…
- माणसाला माणूस जोडूनी
- समानतेची पेरणी केली.
- ढोंगीपणाच्या नायनाटासाठी
- स्वतःची वाणी बुलंद केली….
- धर्मशाळेच्या कार्यातूनी
- विषमतेला मूठमाती दिली.
- वऱ्हाडी भाषेच्या गोडीतून
- जनक्रांतीची नीव रोवली….
- बाबासाहेबांच्या क्रांती प्रेरणेची
- सतत अग्नीज्वाला तेवत ठेवली.
- अंधरूढीच्या पाखंड्यावर
- सत्यवाणीची मशाल धरली…
- बहुजनाला सोबत घेऊनी
- माणूसकिची ज्याेत पेटवली.
- कामाशिवाय अन्न न घेता
- कष्टांची महती घडवली…
- समाजउत्थानासाठी जीवन वाहुनी
- अख्खा महाराष्ट्रात जागृती केली.
- देव नसणाऱ्या दगडावरती
- शब्द वज्राची तोफ डागली….
- धर्म गुलामीत अडकलेल्यांना
- सत्यधर्माची संजीवनी दिली.
- सत्यशोधक स्वतः बनूनी
- माणूसकिची ऊर्जा दिली….
- गाडगेबाबा रंजल्यागांजल्याचा
- कैवारी बनला तुम्ही.
- माणसात देव शोधणारा
- संत बनला तुम्ही…
-संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००