- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरदराव इंगळे श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार संस्थेचे विश्वस्त सुधाकरराव बांते, बालकरामजी भोगे,विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर नागपुरे,विज्ञान शिक्षक अनंत डुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालयांमध्ये २०२० मध्ये पदवी प्राप्त केलेल्या एकूण ३८ विद्यार्थ्यांपैकीं निवडक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले. कोविड-१९ च्या शासनाच्या निश्चित नियमाचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच यावेळी श्रीसंत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांतभाऊ सेलोकार आणि श्री संत शंकर महाराज विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नवनिर्वाचित प्राचार्य म्हणून रुजू झालेले प्राचार्य रामेश्वर नागपुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ. मेघा सावरकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.