- दुर जातांना तुझ्यापासून मी,
- तुझ्यातच हरवत होते…
- तुझ्याासुन निरंतर जाऊन मी,
- माझ्यातच दुरावत होते…
- होत पेन कागद हातात.., पण,
- त्याकडे स्थिर मी बघत होते.., कदाचित,
- मी माझ्याच मनात शब्दांच
ा
- शोध घेत होते…
- खूप काही हीलायचे होते..,पण,
- सुरुवात करावी कुठे हे कळत नव्हते…
- जेव्हा कळलं काही तेव्हा…
- शब्द मात्र वळत नव्हते…
- दुर गेल्यावर परत मागे वळून,
- बघावं वाटतं होते…, पण,
- बघितलं तेव्हा कळलं कुठेतरी,मी
- स्वतःतच हरवले होते…
- मग, मी माझ्याच जळक्या श्वासांना
- आवरत होते…
- तुझ्याच आठवणीत पुन्हा नेत्र विलुप्त
- होत होते…
- -निलिमानिवृत्ती बोरकर
- वायगाव, जि.भंडारा