नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीस दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले की, आता आम्ही दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढू. पोलिस आता आम्हाला अडवणार नाहीत. ते म्हणाले की आम्ही वेगवेगळ्या पाच मार्गावरून आमची परेड काढू. परेड शांततेत होईल.
पोलिस व शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले की, सुमारे १00 किमी ट्रॅक्टर परेड होईल. परेडसाठी जितका वेळ लागेल तितका दिला जाणार आहे. दर्शन पाल म्हणाले की, ही परेड एक ऐतिहासिक असेल जी जग पाहेल. परेडचा पूर्ण मार्ग आणि वेळ याबद्दल माहिती दिली जाणार आहे.
शेतकरी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यावर ठाम होते, परंतु दिल्ली पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणातील सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितले की, पोलिसांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल. दिल्ली एनसीआरमधील ट्रॅक्टर परेडमध्ये भाग घेण्यासाठी बर्याच राज्यांचे शेतकरी दिल्लीत येत आहेत. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते जोगेंद्र तालू यांनी शनिवारी दावा केला की भिवानी जिल्ह्यातील पाच हजार ट्रॅक्टर प्रस्तावित शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली येथे रवाना होतील.
सुमारे दोन महिन्यांपासून अन्नदाता थंड वातावरणात आपल्या हक्कांसाठी सीमेवर बसून आहे, परंतु सरकार त्यांची हुकूमशाही वृत्ती सोडण्यास तयार नाही, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकार आणि सार्वजनिक क्षेत्र उद्ध्वस्त केल्यानंतर आता भाजप सरकार शेती व अन्नसुरक्षेचा नाश करण्यासाठी तीन कृषी कायदे घेऊन आला आहे, असा आरोप तालू यांनी केला.
Related Stories
December 7, 2023