रिसोड : महाराष्ट्रातील शेतकरी हा नेहमी निसर्गाच्या अस्थिरतेमुळे तर कधी अवकृपेमुळे संकटात येत असतो. यावर्षी महाराष्ट्रामध्ये निसगार्ची अवकृपा होऊन अतवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे पूर्णत: नुकसान झाले होते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील वाशीम जिल्ह्य़ामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व यवतमाळ जिल्ह्य़ामध्ये इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी शेतकर्यांच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकरिता कार्यरत असता लाखो शेतकर्यांनी काढलेल्या पीक विम्यापैकी शेतकर्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानाचा मोबदला अगदी मोजक्या शेतकर्यांना देऊन केंद्र शासन, राज्य शासन व शेतकर्यांचे करोडो रुपये फस्त करण्याचा डाव करणार्या या कंपन्या विरोधात शेतकर्यांच्या या प्रश्ना बाबत झगडून शेतकर्यांना न्याय मिळवा या करीता खा. भावनाताई गवळी यांनी शेतकर्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाचा बांधा बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर यवतमाळ येथे दि. २८ डिसेंबर २0२0 रोजी ‘जवाब दो ‘ आंदोलन केले, यावेळी आंदोलना दरम्यानच्या चर्चेत इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाला सोयाबीनचा आकार विचारला असता सोयाबीन बोरा ऐवढी असते या व्यवस्थापकाच्या उत्तरावरून या खाजगी कंपन्यांना शेतकर्या विषयी कुठलीही आस्था नसून शेतकर्यांचे काहीही घेणे देणे नाही. ज्या पिक विमा कंपनीच्या व्यवस्थापकाला सोयाबीनचा आकार केवढा असतो हे माहीत नाही, तर ती पीक विमा कंपनी स्वत:चे खिशे भरण्याकरीता शासनासह शेतकर्यांची फसवेगिरी करीत आहे. शेतकर्यांचा पिक विमा या विषयी खा. गवळी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटून शेतकर्यांच्या पिक विमा संदर्भात होत असलेल्या पिक विमा कंपनीच्या आपलपोटी धोरणा विषयी सर्व बाबीवर चर्चा झाल्यानंतर मा. ना. उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे कृषी सचिव श्री एकनाथ डवले यांच्या सोबत चर्चा करून माज्या महाराष्ट्रातील शेतकर्यांवर अन्याय होऊ नये, विदर्भ व मराठवाडा येथील शेतकर्यांना नेहमी होणार्या कधी अतवृष्टी तर कधी दुष्काळ सदृष्य परिस्थीतीमुळे पिका विमा कवच असणे गरजेचे आहे. व त्याकरीता पिक विमा योजना खाजगी कंपन्या ऐवजी केंद्र किंवा राज्याच्या शासकीय यत्रणेमार्फत राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या सुचना कृषी सचिव यांना दिल्या.
Related Stories
September 30, 2024