मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांनी सुरू केलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. त्यातच आता महाराष्ट्रातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आलेला भव्य राज्यव्यापी वाहन मोर्चा नाशिक येथून सुरू होऊन आज संध्याकाळी मुंबईत दाखल झाला आहे. आता हा मोर्चा आझाद मैदान येथे थांबणार असून, सोमवारी हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे.
हा वाहन मोर्चा शनिवारी सायंकाळी सुमारे २0 हजार शेतकर्यांचा हा मार्च ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता रविवारी २0 हजार कष्टकरी सकाळी साडेआठ वाजता घाट्नदेवी ते कसारा घाट मार्गे लतीफवाडी हे १२ किलोमीटर चे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाला .
शेकडो वाहने घेऊन जाणार्या सुमारे २0 हजार शेतकर्यांनी १२ किमी चा अवघड घाट पायी प्रवास करीत व केंद्र शासनाचा निषेध नोंदवत नाशिक मुंबई लेन वर दाखल होत पुढे कसार्यापासून मुंबई राजभवानाकडे वाहन मार्च सुरू केला आणि मुंबईत धडक दिली.
या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना राज्यभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यां सहभागी झालें आहेत. नाशिक ते मुंबई असे अंतर कापत हा मोर्चा रविवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाला.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024