- * खड्डेमय रस्त्याचा होणार सर्वांगीण विकास…
- * नगरसेवकांच्या प्रयत्नाला यश..
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या शेगांव-रहाटगांव रोडवरील काही भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे दर्शन होत होते. परंतु नगरसेवकांनी विशेष लक्ष देऊन हा रास्ता खड्डेमय करण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेवकांच्या मागणीला मनपा आयुक्त यांनी हिरवी झेंडी दाखवत शेगांव-रहाटगांव रोडवरील माईल्सस्टोन हॉटेल ते मज्जीद पर्यंतच्या रस्त्याला परवानगी देत २७ लाख ६८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याने आता हे खड्डेमय रस्ते सर्वांगीण सुंदर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
आज शुक्रवार रोजी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक विजय वानखडे, गोपाळ धर्माळे यांच्या हस्ते या सोहळ्याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गिरी, अभिषेक लोखंडे, प्रदीप शेळके, अजय शेळके, गिरीश चवरे, निलेश अर्डक, संदीप बाजड, दिलीप चव्हाण, गौरव पडोळे, कळंबे काका यांच्यासह ए/बी रेसिडेन्सी येथील रहिवासी व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेगांव-रहाटगांव रोडवर अनेक दिवसांपासून नालीचे पाणी वाहत असल्याने तसेच संततधार पावसामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्याचबरोबर आजपर्यंत नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांना या त्रासाबद्दल माहिती दिली होती. याच शेगांव-रहाटगांव रोडवरील रस्त्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने अनेकांना दुखापती सुद्धा झाल्या आहेत. या दुखापती रस्त्याची नगरसेवक विजय वानखडे, गोपाळ धर्माळे, मडघेताई यांनी पाहणी करून रस्ता दुरुस्तीची मागणी शासनाकडे केली होती. सद्यपरिस्थिती लक्षात घेता नगरसेवकांच्या मागणीला शासनाने मान्यता दिली असून आता हा रस्ता १२० दिवसात पूर्ण होणार असल्याचे निविदेत सांगितले आहे. अखेर रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त मिळाल्याने परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.