- शेंदूरजना बाजार/ नरेश इंगळे
नुकताच संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेंदुर्जना बाजार ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष समर्थित बहुजन विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.लढा संघटना समथित पॅनलला तीन जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेस समर्थित बहूजन विकास पॅनलने माजी सरपंच दीपक सावरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली होती तर ग्रामस्वराज्य पॅनेलने लढा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली होते. विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेस समर्थित बहूजन विकास पॅनलचे दामोदर हरिभाऊ निमकर, विशाल दीपक सावरकर, दिपाली प्रफुल उमप,आशा किशोर चौधरी, शीला सिद्धार्थ खांडेकर,प्रतिक्षा प्रशांत कुरलकर तर लढा संघटना समर्थित पॅनलचे पंकज निळकंठ चौधरी,अरविंद किसान वेरुळकर रीना विशाल वाघमारे यांनी संपादन केलेला आहे.विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेले आहे भगवान गौतम बुद्ध,महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बहुजन विकास पॅनेलने उमेदवारांचे स्वागत केले आहे.