- बंडूकुमार धवणे
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधील करजगांव ग्रामपंचायतचा निकाल नुकताच जाहिर झाला असून शिवसेना गटाचे परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत वार्ड क्र. 1 मधून गजानन हरीचंद राठोड, सौ. कविता देवराव राठोड, सौ. शितल कृष्णाजी राठोड, हे तर वार्ड क्र. 2 मधून कृष्णाजी रायसिंग राठोड, रामेश्वर किसनराव चव्हाण, सौ. वंदना खेमराज राठोड आणि वार्ड क्र. 3 मधून संतोष रामरावजी चौधरी, सौ. विना श्रीकृष्ण ठाकरे, सौ.भाग्यश्री गोपाल गावंडे हे विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून होते. परिवर्तन पॅनेलने 9 पैकी 9 जागा जिंकून प्रतिस्पर्धी पॅनेलकडून ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली. मतमोजनीदरम्यान तालुक्याच्या ठिकाणी उपस्थिती नागरिकांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. परिवर्तन विजयी पॅनेलचे उमेदवार आपल्या यशाचे श्रेय पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांना देत आहे.