अमरावती : “दि.10जानेवारी 1760 रोजी पानिपत येथे मराठा विरुद्ध अब्दाली यांच्यात घनघोर युद्ध झाले.50 हजार सैनिक असलेल्या मराठ्यांवर अब्दालीने हल्ला केला.बंदूक विरुद्ध तलवारी व भाले असे हे युद्ध होते.दत्ताजी शिंदे हे सर्वात शूर तरुण मराठा सरदार युद्धात शहीद झाले.पुन्हा दिनांक 14 जानेवारी 1761 रोजी युद्धाचा भडका उडाला.या युद्धात एक लाख सैनिकांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव पेशवे शहीद झाले. त्यामुळे जिंकत असलेले मराठे खचले आणि हरले.परंतु मराठा सरदार शूरपणाने लढले त्यामुळे पानिपतची लढाई इतिहासात अजरामर झाली” असे विचार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते संतोषजी झामरे यांनी व्यक्त केले.
ते शिक्षक साहित्य संघाच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती जिल्हा शाखेतर्फे आयोजित नुकताच संपन्न झालेल्या “पानिपतची लढाई” या विषयातील ऑनलाइन व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
या ऑनलाईन व्याख्यानमालेचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ.गणेश चव्हाण , (अध्यक्ष,शिक्षक साहित्य संघ, नागपूर )तर प्रमुख अतिथी म्हणून जयदीप सोनखासकर,(संस्थापक अध्यक्ष,शिक्षक साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य ) होते. प्रा. डॉ.गणेश चव्हाण यांनी “शिवव्याख्याते संतोष झांबरे यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून पानिपतच्या लढाई विषयी सखोल माहिती सर्वांना मिळाल्याचे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी जयदीप सोनखासकर यांनी ऑनलाइन व्याख्यानमाला यशस्वीपणे आयोजित करीत असल्याबद्दल अमरावती जिल्हा शाखेचे कौतुक केले व अभिनंदन केले. प्रा. अरुण बा. बुंदेले (अध्यक्ष ,शिक्षक साहित्य संघ, शाखा ,नांदगाव खंडेश्वर )यांनी शिवव्याख्याते संतोष झामरे यांचा व शिक्षक साहित्य संघाच्या अमरावती शाखेच्या कार्याचा सविस्तर परिचय करून काव्यमय संचालन केले व *स्वातंत्र्य* *दिन* या स्वरचित अभंग गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.आभार *श्री* *अतुल* *ठाकरे* यांनी मानले.या ऑनलाईन व्याख्यानमालेला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.