- दिड एक वर्षानंतर
- गजबजून गेल्या शाळा
- हळूहळू थोडं थोडं
- बोलू लागला फळा
- उत्साहाला उधाण आले
- किलबिल झाली सुरू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- कोमेजलेल्या मुखावरती
- आली गोड हसरी लाली
- मित्रा समवेत हसतांना
- उमटे गोड खळी गाली
- वही पेन पेन्सिल दप्तर
- आणि लगबग झाली सुरू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- प्रकाशाची वाट दिसली
- संपून गेली काळ रात्र
- पायरीवरती शाळेच्या
- मुलांचे दाटून आले गात्र
- प्रतिक्षेचे दिवस गेले
- पालक लागले घाई करू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- अंधाराच्या युगाचा
- झाला आज अस्त
- हसत खेळत बागडताना
- फुले उमललेली मस्त
- गोल गोल रिंगण करून
- आनंदाने नाचू फेर धरू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- हसत खेळत उत्साहाने
- चालू करू आता ध्यान
- बंद झालेल्या पुस्तकाचे
- हळुहळू उघडू पान
- मास्क अन् सॅनिटाईजर
- वापरु, दुरुन गोष्टी करू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- नको नको त्या दुषणांचा
- पडला होता पाऊस
- शिक्षकांना कधीच नव्हती
- घरी राहण्याची हावूस
- सहनशील प्राणी आहे
- त्याची थट्टा नका करू
- शिकवायला तत्पर झाले
- साऱ्या शाळेतील गुरू
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
(Images Credit : Tarun Bharat)