अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 6 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.
आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये किरण रामराव नाईक, सतिश माधव काळे, डॉ. नितीन धांडे, रामदास गंगाराम इंगळे, भाऊराव सरकटे, डॉ. नितीन गणपत चवाळे यांचा समावेश आहे.