आयुष्य वाहले । लोकांसाठी ।।
महिन्याला दंड । एक रुपयाचा ।
ज्यांनी शिक्षणाचा । भंग केला ।।
सतीप्रथा बंद । करण्या धावले ।
राजर्षी पावले । विधवांना ।।
सन्मान करण्या । भीमजींच्या घरी ।
शाहूजी सत्वरी । गेले होते ।।
शाळा, पाणवठे । सर्वांसाठी खुले ।
त्यांनी लाखो फुले । फुलविली ।।
देऊन मान्यता । पुनर्विवाहाला ।
तडा अन्यायाला । त्यांनी दिला ।।
कलावंतांनाही । दिला राजाश्रय ।
सर्वांना अभय । जगण्यास ।।
सहकारी संस्था । निर्माण करून ।
दिले उद्धरून । अनेकांना ।।
आंतरजातीय । लग्नास होकार ।
सर्व अधिकार । महिलांना ।।
रयतेचे राजे । शाहू महाराज ।
राहील समाज । ऋणी सदा ।।
अजु आठवतो । त्यांना अभंगात ।
हर्ष समाजात । त्यांच्यामुळे ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७