मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या ते ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचे कारण असल्याचे तपासणीनंतर समोर आले होते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानंतर ३0 मार्च रोजी रात्री पवारांवर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी त्याचवेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांच्यावर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. डॉ. बलसारा यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर पवारांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024