अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात २५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा करतात अमरावती जिल्हयातील व्यापारी व मजुर वर्गाकडून मुख्यमंत्री यांच्या या निर्णया विरोधात तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.६ एप्रिल रोजी अमरावती शहरातील सर्व व्यापारी वर्ग व तरूण वर्गाने लॉकडाऊनच्या विरोधात घोषणाबाजी करीत अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रीत असतांना लॉकडाऊनची गरज काय?असा प्रश्न देखिल उपस्थित केला. दरम्यान जिल्हयाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करून केवळ शनिवार व रविवार चा लॉकडाऊन मान्य असल्याचे सांगुन या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांसोबतच चर्चा करणार असल्याचे सांगितले.
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या अनेक शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही मोठया प्रमाणात आहे. देशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम हा मोठया प्रमाणात जाणवु लागला असून यावर पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात २५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. संचारबंदी व जमावबंदी अशा स्वरूपाचा हा लॉकडाऊन राहणार आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसायाना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हयातील व्यापारी व कामगार तसेच तरूण वर्गाकडून मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाचा तिव्र विरोध केल्या जात आहे. या संदर्भात ६ एप्रिल रोजी व्यापारी व तरूण वर्गाने रॅली काढून आपला विरोध दर्शविला.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024