दाढी डोक्सी वाळवून देश सन्यासीच झाला
अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कनाच मोळला
पायापासून कमरीपर्यंत खालीच वाकला
शिक्षणनितीचा नवा चेहरा घोयात घातला
सामाजीक विषमतेचा बजारच मांडला
म्हैस बसली डोबीत हल्या उताना झाला
गावचा कारभारी जसा नवरदेवच झाला
महागाईनं त भौ सारा कहरच केला
चांगल्या दिवसावरचा विश्वासच गेला
राजकीय व्यवस्थेनं त भौ डोंगाच बसोला
सत्तेच्या बठ्या बैलानं पोया साजरा केला
आता वाहीले नविन सांड्या घेतला पायजे
डंग-याच्या गुबळ्यावर लाथ मारली पायजे
– अरुण विघ्ने