- वृद्धपण एक ।
- नवं बालपण॥
- जिर्ण असे तन।
- सुकलेले॥ १॥
- बोलणे वागणे।
- बाळासारखेच॥
- हटवाद तोच ।
- वृद्धपणी॥ २॥
- म्हातारबाळाची।
- मुलं मुली आई॥
- तीच त्यांची माई।
- सेवेकरी॥ ३॥
- म्हाताऱ्या आईची।
- कानी येई हाक॥
- माई सेवा एक ।
- पुण्यकर्म॥ ४॥
- सेवा करताना ।
- संकोच सोडावा॥
- आनंद मानावा ।
- जीवनात॥५॥
- मायबाप सेवा ।
- कर्तव्य जाणीव ॥
- कुठे ना उणीव ।
- ठेऊ नये॥६॥
- पुण्य कमावलं।
- म्हणे असे कोणी॥
- शुभ जनवाणी।
- सुखमय॥७॥
- आईंचे बाबांचे ।
- सेवेकरी व्हावे ॥
- आशीर्वाद घ्यावे।
- जीवनात॥८॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर,अमरावती.
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- Email Id:-arunbundele1@gmail.com
(Images Credit : Loksatta)