वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो.
विचार करायला गेल्यावर एक मिनिट..
आणि सिध्द करायला संपूर्ण आयुष्य…..
अगोदर विश्वास स्वतः वर ठेवा…
स्वतः वर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच आपल्या आयुष्याला परावर्तित करतो.
जिथे आपली कदर होत नाही तिथे अजिबात जायचं नाही.
ज्यांना खरं बोल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही.
जे नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही.
आपल्या हातून एखाद्याचं काम होत असेल तर ते निस्वार्थ व निसंकोच करा.
दुसऱ्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.
नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल.
आणि हरलात तर अहंकार हरेल.
पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात..
तर तोच तलाव कोरडा झाल्यास किडे माशांना खातात.
संधी सगळ्यांना मिळते. फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा
एखद्या जवळ अशा आठवणी येऊन जा की.
नंतर जर त्याचाजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याचा ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की आलं पाहिजे …
तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके ठेऊन रडू नाही शकत..
आणि स्वतः ला आनंदाने मिठी ही नाही मारू शकत.
आयुष्य म्हणजे दुसऱ्यासाठी जगण्यायची बाब आहे.
जगातील सर्वात सुंदर रोपट हे विश्वासच असतं आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवाव लागत .
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने निघून ही जातात…
वादळ महत्तवाचे नसते.. प्रश्न असतो की आपण त्याचाशी कशी झूंज देतो आणि त्यातुन कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर पडतो…..
विश्वास हा खोड राबरसारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी कमी होत जातो…..☺️
कु.भाग्यश्री व्यंकट घुरघुरे..