- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने‘विधी सेवा महाशिबिर’ रविवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित असतील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर अध्यक्षस्थानी असतील.
‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि हक हमारा भी तो है 75’ या विषयावर हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शोएब खान यांनी केले आहे.