शाळा……..त्या शाळेतील विद्यार्थी………. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक. हे शिक्षक अहोरात्र मेहनत करीत असतात. ते विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना शाळेव्यतिरीक्त जो वेळ खर्च होतो. तो वेळ कोणीही मोजत नाही. अलिकडे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. लोकं म्हणतात की शिक्षकांकडे भरपूर वेळ असतो. त्याला सुट्ट्याही भरपूर असतात. पर्यायाने सांगायचे झाल्यास शिक्षकाएवढा कोणीच सुखी नाही. परंतू ते धांदात खोटे आहे. शिक्षकांना जरी सुट्ट्या भरपूर असल्या तरी त्याच्याएवढा दुःखी कोणी नाही. कारण त्याला चोवीस तासच आपला वेळ अध्यापनासाठी द्यावा लागतो. यात कोणी म्हणेल कसे? त्याला उत्तरही आहे.
शिक्षक शाळेत पाच साडेपाच तास शिकवतो. त्यातच तो दर्जेदार शिकविण्यासाठी घरीही अभ्यास करतो. त्याचं टिपण काढतो. ते टिपण वहीत लिहितो. ही जी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सदोदित चालते. हे पाहता शिक्षक सुखी वाटतो का? याचाच अर्थ नाही असा निघतो. तरीही त्याचेबाबत कोणी तसा विचारच करीत नाहीत.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे शिक्षकांचेही आहे. जेव्हापर्यंत कोणी या शिक्षकी पेशात येणार नाही. तेव्हापर्यंत त्याला शिक्षकांचे दुःख समजणार नाही. तसंच दुःख विद्यार्थ्यांच्या जीवनातही आहे. त्यालाही दिवसभर शाळेत राबावं लागते. त्यातच जेव्हा तो घरी जातो. तेव्हा त्यालाही घरची मंडळी स्वस्थ बसू देत नाही. त्यालाही घरची मंडळी वेगवेगळ्या स्वरुपात निरनिराळी कामं करीत असतात. या अशाच कारणानं त्यांना शाळेत रमत नाही. शाळा त्यांना निरस व कंटाळवाणी वाटते. अशावेळी त्यांना शाळा निरस व कंटाळवाणी वाटू नये म्हणून शालेय प्रशासनानं त्यांच्यासाठी शाळेत विविध लाभाच्या योजना आणल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
- १) शिष्यवृत्ती योजना.
विद्यार्थी शिकावा व त्याला शाळेत खर्च येवू नये म्हणून त्याला शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवितात व शिक्षणासाठी त्यांना आपल्या पालकांवर पैशाच्या बाबतीत जास्त अवलंबून राहावे लागत नाही.
- २) पाठ्यपुस्तक योजना.
शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पाठ्यपुस्तके मोफत असतात. त्याचं शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कंटाळा वाटत नाहीत.
- ३) मध्यान्ह भोजन योजना.
विद्यार्थी लाभाच्या योजनेत मध्यान्ह भोजन योजनेचाही समावेश होतो. अति दुर्गम तसेच शहरी भागातही काही विद्यार्थ्यांना घरी बरोबर जेवायला मिळत नाही. त्यातच ते उपाशी राहतात. त्याचं कारण त्यांच्या पालकांचं विश्वकोटीचं दारिद्रय. पालक हे गरीब असतात. त्यातच ब-याच पालकांना तीनच्या वर मुलं असतात. म्हणून सरकारनं ही योजना सुरू केली आहे. या माध्यमातून पुर्वीही शाळेत अंडे, दूध, उकळपेंढी मिळासची. त्यानंतर काही दिवसानं तांदूळ देणे सुरु केले होते. नुकतेच काही दिवसानंतर मध्यान्ह भोजन योजना सुरु केली आहे.
- ४) पैसे वाटप.
शाळेत शिष्यवृत्ती मिळत असली, पाठ्यपुस्तके मिळत असली, मध्यान्हभोजन असलं तरीही काही मुलं शाळेत येत नाही. अशावेळी ती शाळेत यावी म्हणून त्यांना पैसेही दिले जातात. याला उपस्थिती शुल्क (भत्ता) म्हणतात. हे शुल्क ज्या दिवशी जो मुलगा शाळेत येतो. त्यालाच मिळत असते.
- ५) वैद्यकिय विमा योजना.
वैद्यकीय विमा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शाळेत अपघात झाला किंवा घरीही गंभीर स्वरुपाचा अपघात झाल्यास त्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय विमा मिळत असतो. ह्या विम्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गंभीर आजाराच्या वेळी मदत होत असते. जसे कोरोना आजारात ज्यांचे मायबाप मरण पावले. अशांना मदत म्हणून अनुदान रुपात काही रक्कम मिळाली.
- ६) समावेशीत शिक्षण योजना.
काही विद्यार्थी हे शाळाबाह्य असतात. ते बरेच दिवस शाळेत जात नाहीत. त्यातच त्यांचं वय वाढत जातं. तसेच त्यांना त्या वाढलेल्या वयात शाळेत बसायला लाज वाटते. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना अशी शाळेत बसायला लाज वाटू नये, म्हणून त्यांना त्यांच्या वयानुसार शाळेत त्या त्या इय्यतेत बसायची सरकारनं परवानगी दिली आहे. तसेच जी मुलं विकलांग आहेत ना दिव्यांग आहेत. त्यांनाही त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार रँम्पव्यवस्था किंवा ब्रेललिपीतून शिकविणे सुरु केले आहे.
- ७) तंत्रज्ञान योजना.
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी तंत्रज्ञानाद्वारे शिकावा म्हणून सरकारनं त्यांना संगणक प्रणाली लागू केली आहे. या माध्यमातून सरकारने विद्यार्थ्यांना टैबचेही वितरण केले आहे नव्हेतर करीत आहे. महत्वपूर्ण वस्तूस्थिती अशी की देशातील प्रत्येक बालकाला शिकण्याचा अधिकार असून त्यांनी शिकावं. त्याला सर्वकष ज्ञान मिळावं व तो शिक्षणाच्या टप्प्यावर चांगल्या गुणवत्तेवर जावा नव्हे तर या माध्यमातून त्याचा हातभार देशविकासासाठी लागावा हा सरकारचा उद्देश आहे. परंतू याला काही मर्यादा आहेत. ती मर्यादा अशी की या देशातील लोकं शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेवून शिकतात व शिकून मोठी होतात आणि नोकरी करायला विदेशात जातात. त्यामुळं त्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाला होत नाही तर तो विदेशाला होतो. ही एक शोकांतिकाच आहे. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थी वर्गानं शिकावं व महत्वाच्या योजनांचा लाभही घ्यावा. परंतू घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग देशात राहूनच देशाच्या विकासासाठी करावा. जेणेकरुन देश विकासाच्या क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर येईल व देशाचे जगात नाव होईल. तसेच देश सृजलाम सुफलाम होईल असे वाटते.
- -अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०